Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

सोलापूर –

कोरोना संसर्गजन्य आजाराविषयी जनजागरण करुण गरजु कोरोना रुग्ननांना वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरोना सहाय्यता केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी माहिती देताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की कोरोनाने थैमान घातले असुन राज्यातील सद्याची परिस्थिती भयावह आहे. रुग्नसंख्या झपाट्याने वाढत असुन रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत, ऑक्सीजन, रेमडीसीवार इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकार त्यांच्या पातळीवर काम करत आहे परंतु पक्ष म्हणून कांग्रेसने कठीण काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील कोरोना बाधीत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहाय्य (मदत) करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे आजपासून कोरोना सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले असुन यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यात येणार आहे.

वैद्यकीय सोयी सुविधेसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी खालील नंबरसला संपर्क साधावा 

कार्यालयीन क्रमांक 0217 272488,
प्रकाश वाले 8888802799,
तिरुपती परकीपंडला 8888048808,
संजय देशपांडे 8975193144
या संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केले आहे.

यावेळी अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, हाजी नगरसेवक तौफ़ीक हत्तुरे, नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, प. महाराष्ट्र सेवादल अध्यक्ष सुदीप चाकोते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, फ्रंटल सेलचे भारत जाधव, भीमाशंकर टेकाळे, केशव इंगळे, अशोक कलशेट्टी, अंबादास गुत्तिकोंडा, नागनाथ गायकवाड़, राहुल वर्धा, विवेक कंन्ना, युवराज जाधव, आझम सैफन, हारुण शेख, दशरथ जाधव, संजय गायकवाड़, विजय शाबादे, मोनिका सरकार, एजाज बागवान, राजेन्द्र शिरकुल, सहदेव इप्पलपल्ली, राजेश झंपले, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *