आदेश | ‘या’ तालुक्यात कडक निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सोलापुरातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आदेश लागू केले.

कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील माढा, माळशिरस, करमाळा, पंढरपूर, सांगोला हॉटस्पॉट ठरत असून याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून, सोलापूर जिल्हा ग्रामीण क्षेत्र वेगळा प्रशासकीय घटक मानण्यात येत आहे. त्यामुळे या आदेश ग्रामीण भागात लागू असणार आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण क्षेत्र मधील कोव्हीड-१९ चा दि. ०५.०८.२०२९ रोजीचा पॉझिटिव्हिटी दर ७.१३% असून वापरण्यात आलेले ऑक्सिजन बेड ची टक्केवारी (The Occupancy of total Oxygen Beds) दर हा १८.२४% आहे.

ज्याअर्थी कोविडबाधीत रुग्णांचा पॉझिटीव्होटी रेट व ऑक्सिजन बेडस् (The Occupancy of total Oxygen Beds) व्यापलेली टक्केवारी नुसार शासनाने निश्चित केलेल्या एकूण पाच स्तरांपैकी सोलापूर जिल्हा (सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून) ग्रामीण क्षेत्र तिसऱ्या स्तरामध्ये येत आहे.

दरम्यान,सद्यस्थितीत माढा माळशिरस, करमाळा, सांगोला व पंढरपूर या तालुक्यामध्ये मागील आठवडयापासून कोव्होड-१९ ची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने याठिकाणी अधिक कडक उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी निर्णय घेतला.