Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

सोलापूर.  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 गावामध्‍ये हर घर तिरंगा, स्‍वराज्‍य अभियान, देशाच्‍या स्‍वातंत्र्याची, लोकशाहीची,एकात्‍मतेची, विकासाची गौरवशाली 75 वर्षे आणि कोविड लसीकरण अमृत महोत्‍सवबाबत प्रचार चित्ररथ व ऑडियोच्‍या माध्‍यमातून जनजागृती करण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

        भारत सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने विशेष प्रचार रथाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वतीने हर घर तिरंगा सायकल रॅली आसरा चौक ते होटगीस्टेशन असे सुमारे 12 किलोमीटर काढण्यात आली.

यावेळी केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रचार वाहनाला माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार जयवंत पाटील, एसआरपीएफचे सहाय्यक समदेशक माशाळे, तहसीलदार अमोल वाकडे, तहसीलदार मोहोळे व कार्यालय सहायक जब्‍बार हन्‍नुरे अदि उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *