श्री राजस्थानी विकास मंडळ, सोलापूर यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन १५ ऑगष्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयजन करण्यात आले आहे.अशी माहिती पुरुषोत्तम बलदवा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजाराम उपाध्ये, माणिकचंद डागा, सुरेश भैय्या आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री राजस्थानी विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या 70 वर्षा अधिक समाजकार्य केले जात आहे. जवळपास 70 ते 80 जण या मंडळाच्या माध्यमातून सक्रीय समाजसेवा बजावत आहेत. ओम सच्चिदानंद वाचनालय या ठिकाणी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ग्रंथालयाचे प्रदर्शन ठेवण्यात आल्याची माहिती पुरुषोत्तम बलदवा यांनी दिली.
श्री राजस्थानी विकास मंडळाच्या माध्यमातुन गेली २५ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आणि नागरिकांकडूनही उत्सफूर्त प्रतिसाद या शिबिरास मिळतो. याच धर्तीवर याहि वर्षी श्रीमती गोपाबाई दमाणी रक्तपेढी व अश्विनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी व नागरिकानी उपस्थित राहून या सामाजिक कार्याला हातभार लावावे असे आवाहान श्री राजस्थानी विकास मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.
स्थळ :
ओम सच्चिदानंद वाचनालय, सोलापूर. कस्तुरबा मार्केट, पहिला मजला, बुधवार पेठ, सोलापूर.
वेळ -सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत