सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य भगवान श्री महावीर यांच्या जयंती दिनानिमित्त रंगभवन चौक येथील भगवान महावीर स्तंभास तसेच जुना होटगी नाका येथील भगवान महावीर चौक येथील भगवान महावीरांच्या नामफलकास प्रशासक तथा महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे कौन्सिल येथील मा. आयुक्त यांच्या कार्यालयात भगवान महावीर यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी याप्रसंगी नगर अभियंता संदीप कारंजे, सहाय्यक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, उद्यान प्रमुख निशिकांत कांबळे, विभागीय कार्यालय अधिकारी तपन डंके,साहाय्यक जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार, केतनभाई शहा,हर्षल कोठारी,शाम पाटील,अनिल वेद आदी मान्यवर उपस्थित होते.