Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

अकलूज  शहरामध्ये काही लोक काळी हळदीमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होवून त्याच्या प्रभावाने बरेच कृत्य करता येतात, असे भासवून तसेच सदर वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी किंमत मिळते अशी बतावणी करुन व्यापारी लक्ष्मण धनजी सेंगानी (वय ७३ ) यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी काशीनाथ लडकु पाटील (ता. भिवंडी जि. ठाणे,) योगेश दादा दावले (ता. माळशिरस, जि. सोलापूर,) हेमंत किसन काटे (वय ४२ वर्षे आकुर्डी, पुणे) अतुल मधुकर ताम्हाणे (वय ७१ कळवा, ठाणे) अवधुत केशव शाबासकर (वय ५३ मुंब्रा ठाणे,) मच्छिंद्र हनुमंत डोंगरे (वय ५० अंबरनाथ वेस्ट, कल्याण) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले दोन चारचाकी वाहन (क्र : एम एच ०४ एफ ए ५११६), (क्र: एम एच ०२ डी एस ०८११) व काळी हळद सदृष्य पदार्थ, अॅन्टीरेडीएशन स्प्रे व अॅन्टीरेडीएशन किट आणि अॅन्टीरेडीएशन बॉक्स अशा वस्तू व सिलेंडर इत्यादी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

ही कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पो. हे कॉ, सुहास क्षिरसागर, रामचंद्र चौधरी, विक्रम घाटगे, शिवकुमार मदभावी, चालक विराज नागरगोजे, अजित कडाळे, श्रीकांत निकम यांनी कामगिरी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *