सोलापूर, प्रतिनिधी
ग्रामीण भागात शंभर टक्के नळजोडणी
सोलापूर जिल्हा परिषद 2020 21 करिता एक लाख 81 हजार 274 एवढे नळकनेक्शन देण्याचे उद्दिष्ट असताना 28 मार्च ते 1 लाख 80 हजार 584 घरांना नळकनेक्शन देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
केंद्रशासनाच्या हर घर मे जल या योजनेअंतर्गत सर्व घरांना नळकनेक्शन देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नोव्हेंबरमध्ये पदभार घेतल्यापासून या कार्यक्रमास खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली आहे. स्वामी यांनी विभागीय स्तरावर, मुख्यालय स्तरावर व तालुका स्तरावर ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता उपअभियंता, गटविकास अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका व सर्वसमावेशक कार्यशाळा त्याचप्रमाणे दररोज व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून व प्रत्येकाशी फोन द्वारे संवाद साधून या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आणि आज्या सातत्यपूर्ण पाठपुरावा वर्षभराचे काम नोव्हेंबर ते मार्च या चार महिन्यात पूर्ण झाले आहे.
दरम्यान मार्च 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत कोरोना काळात कडक लॉकडॉऊन कार्यालयात कर्मचाऱ्यांची मर्यादित उपस्थिती गाव पातळीवर लॉकडॉऊनमुळे कामात येणाऱ्या अडचणी त्याचप्रमाणे ग्रामसेवक व इतर अधिकारी-कर्मचारी मुख्यत्वे कोरोना संबंधित कामकाजामध्ये वेळ असल्यामुळे या कालावधीत प्रत्येक घरी नळजोडणी कार्यक्रमांमध्ये अडचणी निर्माण होऊन कामे झाली नव्हती. या कालावधीत फक्त दहा हजार नळजोडणीची कामे पूर्ण झाले होते. जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यामुळे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सीईओ यांनी कार्यपूर्ती पंधरवाडा चे आयोजन केले होते. यामध्ये पाच मापदंड देण्यात आले होते
या यशामध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतील अनेक अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गोंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार, सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता शाखा अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक व अनेक नळजोडणी कारागीर यांच्या उत्कृष्ट टीमवर्क मुळे अवघड वाटणारे काम पूर्ण झाले आहे.
उद्दिष्टाच्या पुढे जाऊन कमी कालावधीत काम केल्याबद्दल मनस्वी आनंद
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून चार महिन्यात जिल्ह्यातील अनेक घरांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे काम उद्दिष्टाच्या पुढे जाऊन कमी कालावधीत पूर्ण केले याचा मनस्वी आनंद होत आहे. आतापर्यंतच्या सेवेमध्ये अनेक कामे वेळेत पूर्ण केले आहेत. उद्दिष्ट मिळत असते ते आपल्याकडून पूर्ण होत असते. या कार्यपूर्ती मध्ये यंत्रणेतील सहभागी सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
दिलीप स्वामी,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी