Big9 News
०७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत दिनांक १२/०४/२०२३ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० वा. चे दरम्यान डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्याकरिता अवयवदानाविषयी माहिती व जनजागृतीबाबत एकदिवसीय कार्यशाळा मिटींग हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर शहर येथे संपन्न झाली
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे डॉ. औदुंबर म्हस्के, डॉ. विनायक डोईजड हे उपस्थित होते. डॉ. औदुंबर म्हस्के यांनी अवयवदानाविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे अवयवदानाचे प्रकार, नैसर्गिक मृत्युनंतर कोणते अवयव दान करता येतात. जिवंतपणी कोणते अवयव दान करता येतात, मँदुस्तंभ म्हणजे काय, मेंदुस्तंभ मृत्युनंतर कोणत्या अवयवाचे दान करता येते. नेत्रदान बद्दल माहिती, आरोग्यसेवक आणि नातेवाईकांचे कर्तव्य, मानवी अवयव दान बद्दलचा कायदा, भारतातील अवयवदानाची सद्य परिस्थिती याबाबत डॉ. औदुंबर म्हस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. औदुंबर म्हस्के यांनी उपस्थित पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना अवयवदानाविषयी प्रतिज्ञा दिली.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी आपण देहदान करणार असल्याचे जाहीर केले
सदर कार्यशाळेस ७५ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. दिपक आर्वे होते.