प्रा. डॉ. भीमराव पाटील, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व प्रा. विजय पोहनेरकर यांची हजेरी
सोलापूर : जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापुरात बसव व्याख्यानमालेची सुरुवात करणाऱ्या वीरशैव व्हिजनच्या तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यंदाचे आठवे वर्ष असून यावर्षीचे पहिले पुष्प शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी प्रा. डॉ.भीमराव पाटील (लातूर) हे ‘महात्मा बसवेश्वरांची सप्तक्रांती’ या विषयावर गुंफणार आहेत. पहिल्या पुष्पाचे उद्घाटन आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आयकर विभागाचे उपायुक्त प्रसाद मेनकुदळे, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नीलेश ठोकडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दुसरे पुष्प शनिवार दि. 30 एप्रिल रोजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (सातारा) हे ‘आनंदी जगण्यासाठी’ या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या पुष्पाचे उदघाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली व पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व वीरशैव महासभेचे राष्ट्रीय युवक उपाध्यक्ष सुदिप चाकोते यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तिसरे पुष्प रविवार दि. 1 मे रोजी प्रा. विजय पोहनेरकर (औरंगाबाद) हे ‘हासू आणि आसू’ या विषयावर गुंफणार आहेत. समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. महादेवी दामा व मैंदर्गी नगरपालिकेच्या नगरसेविका सुरेखा होळीकट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
वरील व्याख्यानमाला डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सांयकाळी ६ वाजता होणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, विजयकुमार हेले, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.