Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

14 जानेवारी 1761 या रोजी पानिपत या ठिकाणी महमदशहा अब्दली व भाऊसाहेब पेशवे यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले.यामध्ये महाराष्ट्रातील एक लाख तरुण मुलांचा तरुण युद्धामध्ये धारातीर्थी पडले यामध्ये डोंगरगाव व सांगोला तालुका या परिसरातील 70 पेक्षा अधिक लोक धारातीर्थी पडले, यामध्ये महिपतराव बाबर,लिंबाजी बाबर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या फौजे मध्ये 70 पेक्षा अधिक लोक धारातीर्थी पडले. त्यामध्ये महिपतराव व लिंबाजी हे बाबर घराण्यातील कर्ती माणसं धारातीर्थी पडली. यामध्ये गोविंदराव हे वाचले यामुळे या पानिपत युद्धामध्ये सांगोला तालुक्यातील डोंगरगाव या परिसरातील योद्ध्यांनी अतुलनीय पराक्रम दाखवलेला.

या गोष्टीला 261 वर्ष होऊन गेलेले आहेत त्यामुळे हा 14 जानेवारी त्यांचा स्मृती दिवस व शौर्य दिवस मोठ्या उत्साहात मध्ये डोंगरगाव येथील महिपतराव बाबर समाधीस्थळावर समाधीस्थळावर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.कोरोणा च्या बंधनामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम न करता सकाळपासून समाधीची पूजा त्यानंतर भजन किर्तन व फुलांचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.

याप्रसंगी कोळीगीरी येथील श्री भैरवनाथ मंदिरातील व्यवस्थापक पाटील गुरुजी यांनी सदर मोहीमे विषयी सविस्तर माहिती व इतिहासाची अद्यावत भूमिका परखडपणे मांडली.डोंगरगाव ही भूमी महाराष्ट्राच्या नव्हे देशाचा इतिहासामध्ये अजरामर आहे.याच मातीतील शेकडो लोकांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान केलेले आहे. ही बलिदानाची व त्यागाची भूमी याला वंदन करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी 14 जानेवारीला यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी विचार व्यक्त करताना जगदीश बाबर यांनी महिपतराव बाबर, गंगाजी बाबर, श्री नारायण बाबर व आत्तापर्यंतच्या बाबर कुटुंबियातील इतिहास प्रखरपणे मांडला.पानिपतच्या युद्धासाठी 60 हजार रुपयांचे कर्ज काढून पानिपत वरती युद्ध करणारे हे एकमेव कुटुंब असेल आणि तीच भूमिका हीच भूमिका आजची आमची पिढी सुद्धा राबवत आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आलेगाव येथील सिद्धनाथ मंदिराचे ट्रस्टी श्री शिवाजी बाबरगुरुजी,आगळगाव येथील जगन्नाथ पाटील गुरुजी, त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी त्याचबरोबर संजय काशीद, डोंगरगावचे सरपंच श्री पवार, विशाल बाबर विठ्ठलराव बाबर, गजानन बाबर, राजकुमार बाबर, महेश बाबर, उद्योगपती धनंजय भिंगे, सोमनाथ सपाटे, शरद बाबर, नाना बाबर सयाजी बाबर व डोंगरगाव, मानेगाव, आलेगाव व चोपडी आदी परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *