Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मुंबई,दि.24 : सोन्याचे भाव वाढले आहेत. तरीही लोकं सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यात लग्नसराईचे दिवस जवळ आल्यानं सोन्याची मागणी वाढली आहे. सहसा सोने खरेदी करावी असे सर्वांना वाटते. पण बजेट अभावी सोने खरेदी करू शकत नाहीत.

PhonePe तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आले आहे. सध्याच्या काळात सोनं खरेदी देखील ऑनलाईन झाली आहे. कोणताही ग्राहक एक रुपयांपासून सोनं खरेदीची सुरुवात करु शकतो. फोन पेने (PhonePe) यासंदरभात माहिती दिली. 35 टक्के शेअर्ससोबत सोनं खरेदी करण्यासाठी भारतात सर्वात मोठा डिजीटल प्लॅटफॉर्म बनल्याचे फोन पेने सांगितले. यावर्षी दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सणांच्या दिवसांत त्यांच्या माध्यमातून झालेल्या सोने विक्रीत 6 टक्क्यांनी वाढ झाल्याचे देखील फोन पे ने म्हटलंय.

फोनपेकडे सोनं खरेदीसाठी चांगल्या डिजाईन आणि प्लॅटफॉर्म आहे. ग्राहकांना दरमहा सोनं खरेदीसाठी मदत व्हावी यासाठी आम्ही रिमाईंडर सेवा सुरु करतोय असेफोनपे म्यूचुअल फंड्स एंड गोल्ड (Phone Pe Mutual Funds & Gold) चे प्रमुख टेरेंस लुसिएन यांनी सांगितले. नियमित गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी माइलस्टोन सुविधा असल्याचे ते म्हणाले.

ग्राहकांना सोनं डिलीव्हरीचा पर्याय देखील मिळू शकतो. नाणी किंवा बिस्किटच्या रुपात याची घरापर्यंत डिलीव्हरी मिळू शकते. अर्धा ग्रामपेक्षा कमी वजनापासून याची पूर्तता होऊ शकते. पूर्ण भारतातून 18 हजार 500 हून अधिक पिनकोडपासून ग्राहक फोनपेने सोनं खरेदी करु शकतात. ज्यामध्ये छोट्या गावं आणि शहरांमधील 60 टक्के ग्राहक आहेत.

डिसेंबर 2017 मध्ये फोन पे सोनं कॅटेगरी सुरु केली आणि गेल्या 3 वर्षांपासून सेफ गोल्ड आणि एमएमटीसी-पीएएमपीसोबत भागीदारी केली. यामुळे देशभरातील ग्राहकांना ऑनलाईन सोनं खरेदी करता येते. फोन पे वर खरेदी केलेलं सोनं हे 24 कॅरेटचं असली सोनं असतं. जे ग्राहकांच्या बजेटनुसार कधीही खरेदी केलं जाऊ शकतं. याची किंमत 1 रुपयांपासून सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *