कार्यकुशल आ. प्रणिती शिंदे वाढदिवस विशेष – सागर शहा

Big9news Network

नुकताच वैभवी फाउंडेशनच्या वतीने नारीशक्ती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मतदारांसाठी मोफत मतदान नोंदणी अभियान, वृक्षारोपण, प्रभागातील रस्त्यांची कामे, गरजूंना चांगले कपडे, अन्नधान्य, मोफत लसीकरण अशी अनेक कामे करत सागर शहा यांनी अल्पावधीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

सोलापूर शहर मध्य च्या लोकप्रिय आमदार , समाजसेवा करत असताना सतत प्रत्यक्ष लोकांच्या संपर्कात जाऊन, तळागाळातील जनतेपर्यंत स्वतः पोहचून जनतेच्या समस्या सोडवल्याने , स्वतः जनतेत मिसळून अनेक लोकउपयोगी सामाजिक कार्य केल्याने , जनतेने ताईना शुभेच्छा रूपी आशीर्वाद तसेच प्रेम देऊन सलग 3 टर्म म्हणजेच सलग 15 वर्ष निवडून दिलं, अशा या रणरागिणीला आणी वेळप्रसंगी वाघिणीचे रूप घेऊन जनते करीता, लोकउपयोगी ठाम निर्णय घेणाऱ्या वाघिणीला मी सागर शहा व तमाम सोलापूर शहर वासियांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो… प्रसंग कोणताही असो सुख किंवा दुःखाचा ताई मात्र नेहमीच सोबत…! ज्या कोरोना काळात लोक घरा बाहेर येण्यास घाबरत होते अशा वेळी देखील आपण लोकांच्या सेवेसाठी जनतेला आधार देत , मदत करत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपले कार्य अखंड चालू ठेवले… विडीकामगरांचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, अथवा रोजगाराचा प्रश्न असो आपण नेहमीच सर्वांच्या एक पाऊल पुढे असताना जनतेने पाहिलय ..ताई खूप काही आहे आपल्याबद्दल लिहिण्यासारखं असो…

खरच सलाम तुमच्या कार्याला… आपल्या या वाढदिवसानिमित्त आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभु दे , आपल्या सर्व ईच्छा आकंशा आणि मनोकामना पुर्ण होवो, आपल्या हातुन असेच अविरत समाजकार्य घडत राहो व ईश्वर त्या करिता आपणास शक्ती देवो हीच आई श्री विजय वैभव लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो..
पुनश्च आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपला
– श्री सागर राजकुमार शहा
सचिव – सोलापूर शहर युवक काँग्रेस