मोठी बातमी! देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन

Big9news Network

तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये एक मोठा अपघात झाला आणि लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी तसेच अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते.

या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बिपिन रावत व त्यांच्या पत्नीसह, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.

 

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन.