Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

मंगळवारची सायंकाळी पाच वाजताची वेळ होती. एक महिला कंबर तलावाजवळील पुलाच्या लोखंडी पाईपवर चढत असताना राष्ट्रवादीच्या नेत्या सौ.मनिषा नलावडे यांच्या नजरेस आले. माग त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या महिलेला धरून ओढले. याच प्रसंगी तिथे हजर असलेले रेल्वेचे पोलीस शिपाई मिथुन राठोड यांनीही समयसूचकता दाखविली व मदत कार्यात पुढाकार घेऊन त्या महिलेला बाजूला घेतले. हे दृष्य बघता त्या रस्त्यावरून निघालेले काँग्रेस नेते डाॅ.बसवराज बगलेंनी ही त्यांची मदत केली आणि त्या आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला बाजूला घेण्यात यशस्वी झाले. रेल्वे पोलीस मिथुन राठोड आणि मनिषा नलावडे यांची नजर त्या महिलेवर पडली नसती तर क्षणार्धात एका जीवाचा बळी गेला असता.  तिला वाचविल्याचे खूप मोठे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मात्र त्या महिलेला रस्त्यावरून बाजूला घेऊन ऊभे केले तर ती कडकडून रडू लागली. डाॅ. बगले आणि मनिषा नलावडे यांनी तिची विचारपूस केली असता ती प्रचंड तणावात होती. दरम्यान त्याच रस्त्याने निघालेले साखरपेठ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरिक्षक श्री.नरसप्पा राठोड यांना ही घटना दिसली. तात्काळ थांबून त्यांनी चौकशी केली व त्या महिलेला धीर दिला. तिला सावरले कर्ताव्यदक्षपणे आपल्या जवळच्या वाॅकीटाॅकी वरून वायरलेस संदेश दिला. थोड्याच वेळात सदर बझार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस सौ.मनिषा गायकवाड (1420) आणि सौ.तांबोळी (1823) या रणरागिणी दाखल झाल्या.

सर्व जण मिळून त्या महिलेची चौकशी करत होते तर तिला बोलता येत नसल्याने सगळेच विचारात पडले. त्या महिलेचा पत्ता, नाव व ओळख कळत नसल्याने पोलीस उपनिरिक्षक श्री.राठोड यांनी त्या भगिनींला पोलीस ठाण्यात नेऊन तिला मदत करण्याची भूमिका बजावली.

सदर महिलेची काळजी घेऊन पोलीस ठाण्यात पाठवण्यास मदत केली. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राजु तुरबे, रसीद शेख आदींनी या कामात सहभाग घेऊन मदत केली. एका 35 वर्षांच्या ताणावग्रस्त भगिनींला मृत्यूच्या दाढेतून वाचविलेल्या लोहमार्ग पोलीस मिथुन राठोड (518) सौ.मनिषा नलावडे,डाॅ.बसवराज बगले आणि पोलीस उपनिरिक्षक राठोड, यांच्या कर्तव्याचे कौतुक करून गर्दी लागली.

रात्री 7 वाजे पर्यंत त्या महिलेला सदर बझार पोलीस ठाण्यात बसवून तिची सविस्तर चोकशी केली. पोलीस कर्मचारी तमीम हिरापूरे (360) आणि कदम (143) यांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कमलाकर पाटील यांच्या सूचनेनुसार महिला पोलीस राजश्री माळी (1831) यांच्या मदतीने सदर महिलेला तिच्या बहिणीकडे बुधवार पेठेतील मच्छी मार्केटमध्ये पोलीस वाहनातून सोडले. तो पर्यंत डाॅ.बसवराज बगले आणि मनिषा नलावडे पोलीस ठाण्यात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *