Big9news Network
Breaking | राष्ट्रवादीचे नगरसेवक पुत्रास केलं तडीपार
Mh13news Network
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड याला तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
साथीदारासह सामान्य नागरीकांना शस्त्राचा धाक दाखवून दमदाटी करून वेळप्रसंगी जीवे ठार मारणे, साथीदारासह नागरीकांना विनाकारण मारहाण करुन दहशत निर्माण करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणा-या चेतन नागेश गायकवाड, वय २० वर्षे, रा. सेटलमेंट कॉलनी क्र. ०३, विठ्ठल मंदिरजवळ, सोलापूर या इसमास सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा पुणे जिल्हयातील इंदापूर तालूका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतूने राजकीय पदाचा गैरवापर करुन नियमबाहय पध्दतीने काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरीक व व्यावसायीकांना धमकावून पैशाची मागणी करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरीकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कर्मचारी काम करीत असतानासुध्दा धाकदपटशा दाखवण्याच्या उद्देशाने त्याने सरकारी काम करु नये याकरीता अंगावर जाणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर नोंद करण्यात आले आहेत.
राजेश दिलीप काळे, वय ४५ वर्षे, रा. फ्लॅट क्र. १०१, गॅलक्सी अपार्टमेंट, विरशैव नगर, जुळे सोलापूर यांना सोलापूर शहर, जिल्हा पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
डॉ. वैशाली कडुकर पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ)