Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

ग्रामिण भागातील सर्व क्षेत्रात काम करुन आपली मुले घडवत घडवत शेती करुन नवनिर्मीती करणाऱ्या मातांचा सन्मान होणे अन् ते करण्याचे संधी मिळणे आमच्यासाठी सुवर्णक्षण आहे. या माता-माऊली जिजाऊ -सावित्रीचा वारसा चालवत ग्रामिण संस्कृतीचे जतन करीत आहेत, असे प्रतिपादन डाॅ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे बक्षि हिप्परगे येथे
राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त उभयतांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर परस्थितीशी संघर्ष करीत आपल्या मुलांना घडविलेल्या मातांना राष्ट्रमाता जिजाऊ माता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी डाॅ. गायकवाड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्षा नंदा शिंदे होत्या.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या उज्वला साळुंखे, जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड लता ढेरे, आयबीएन लोकमत न्यूजचे सागर सुरवसे, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जिवन यादव, वरळेगांवचे विकास लक्के, अनिल देवकर, डाॅ.नंदीनी देवकर, कासेगाव सेवा सोसायटी माजी चेअरमन तुकाराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात सौ.नागराबाई तुकाराम शिंदे,श्रीमती ताराबाई खेमु राठोड, सौ. लता विश्वास निकंबे, श्रीमती चंद्रभागाबाई मनोहर पवार, सौ. अनील देवकर यांचा गौरव करण्यात आला.

क्रांतिज्योती सावित्री- राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा चालवतांना चांगले संस्कार करुन कुंटुंबाबरोबरच नव समाज घडविण्याचे काम माता माऊलींनी केले आहे, म्हणून त्यांचा सन्मान करताना अत्यानंद होत आहे, असेही डॉ. गायकवाड यांनी यावेळी म्हटले.

आमच्या माता भगिनींमुळेच अनेक सण-उत्सवाबरोबर एकत्र कुंटुब पद्धतीचे नाते टिकून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे. येणार्या नव्या पिढीला ही नाती समजण्याची खूप गरज आहे, असे नंदा शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय जाधव यांनी केले. याप्रसंगी हा सन्मान करण्याचा हेतू त्यांनी विशद केला. ग्रामिण संस्कृती जपताना कुंटुबात शिक्षण व शेतीला महत्व देत एकत्र कुटुंब जतन करणाऱ्या मातांचा सन्मान व्हावा, हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. लक्ष्मण महाडीक यांनी केले तर प्रा. जीवन यादव यांनी मला सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादा माळी, दिगंबर जाधव, गणेश शिंदे, संजय पवार, सागर खांडेकर, प्रशांत यादव, साधना जाधव, स्नेहल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *