Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर,दि.6: नागरी वस्ती सुधार योजना ही राज्यातील नागरी क्षेत्रातील विशेष घटक लोकसंख्येच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविली जाते. गरीब जनतेच्या सोयी-सुविधांसाठी या योजनेतील कामे प्राधान्याने करावीत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

सोलापूर शहरातील वसंत विहार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत , मडकी वस्ती, केगांव येथील रस्ते विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक महेश कोठे, चेतन नरोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेविका ज्योती बामगोंडे, आयुक्त पि. शिवशंकर, पुरुषोत्तम बरडे, संतोष पवार, गणेश पुजारी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. भरणे म्हणाले, नागरी वस्ती सुधार योजनेतील कामामध्ये रस्त्यांच्या कामाबरोबरच नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छता व आरोग्याशी निगडीत असलेल्या कामांना प्राधान्य देऊन कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात यावा.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील कामांसाठी नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजा ओळखून आवश्यक कामांचा प्रस्ताव तयार करून तत्काळ मान्यतेसाठी सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *