Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

 

डायबीटीस आणि मधुमेह कमी करायचा असेल तर योग्य आहार आणि व्यायामाची गरज आहे असे प्रतिपादन प्रसिध्द मधुमेह आणि आहार तज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी केले. रोटरी क्लब सोलापूच्या 85 व्या चार्टर्ड डे निमित्त रंगभवन येथे गुरूवार दि. 11 नोव्हेंबर रोजी आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
जीवनशैली बदलाच्या माध्यमातून वेट लॉस आणि मधुमेह मुक्ती या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माणसाची लाईफस्टाईल बदलत असल्याने प्रत्येक 10 व्यक्तीमागे 2 मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जगात भारत हा मधुमेह आजाराचे केंद्र होत आहे. परंतु योग्य आहार आणि 45 मिनिटात साडेचार ते पाच किलोमिटर चालणे असा व्यायाम केला तर मधुमेह नियंत्रणात नाहीतर समुळ नष्ट होवू शकतो हे पुराव्यासह त्यांनी सांगितले. हजारो लोकांचा लठ्ठपणा आणि मधुमेह यामुळे कमी झाले आहेत. महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात मधुमेह मुक्ती अभियान राबवण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने सोलापूरमध्येही मधुमेह सपुदेशन केंद्र सुरू आहे त्याचा लाभ प्रत्येक मधुकेही रुग्णाने घ्यावा वयाची शंभरी गाठत निरोगी आयुष्य जगूया. चांगले आहार आणि विहाराने इतरांकरीता आपण उदाहरण बनले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष संजय पटेल यांनी प्रास्ताविक केले. रोटरी क्लब हे सामाजिक सेवा करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सोलापूर मध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून रोटेरियन लिमये सर, डॉ. किरपेकर, डॉ. मधुकर प्रधान, प्रा. के. भोगिशियना, दत्तात्रय तुळपुले, डॉ. राजीव प्रधान, झुबीन अमेरिया या मान्यवरांनी आपले योगदान दिले आहे. त्यांचीच परंपरा पुढे नेवून रोटरीच्या माध्यमातून 10 महत्चाचे लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये गरजुंसाठी मोफत रोटरी अन्नपुर्णा योजना, रोटरी रेड क्रॉस स्वगती स्कुल, रोटरी सायकल बँक योजना, रोटरी बुक बँक योजना, रोटरी कायस्वरूपी कृृत्रिम हात पाय बसवणारे सेंटर, रोटरी चिल्ड्रन्स पार्क, रोटरी नाना नानी पार्क, रोटरी काव्य सृष्टी, रोटरी पॉल हॅरिस स्मृतीवन, रोटरी बर्न सेंटर अशा योजना सध्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपण, रक्तदान यासारखे समाजोपयोगी उपक्रम नेहमी सुरू असतात. असेही रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय पटेल यांनी सांगितले. त्यानंतर रोटरी क्लबच्या उपक्रमामध्ये सहकार्य केलेल्या मान्यवरांचा गौरव रोटरीच्या 85 व्या चार्टर्ड डे निमित्ताने करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी रोटरी क्लब सोलापूरच्या चार्टर्ड डे निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी उपप्रांतपाल रोटे. डॉ.ओम मोतीपावळे, माजी उपप्रांतपाल डॉ.राजीव प्रधान, माजी उपप्रांतपाल रोटे.झुबीन अमेरिया यांच्यासह रोटरी क्लब सोलापूरचे पदाधिकारी आपल्या परिवारासह उपस्थित होते. शेवटी रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष रोटे संजय पटेल आणि रोटे कौशिक शहा यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रम राष्ट्रगीताने संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *