Big9 News
दहावीच्या ‘रणरागिनी’ने अडवली आमदारांची गाडी ; निर्भीड पणे मांडली आपली समस्या
सोशल मीडियावर गप्पा मारायला अनेक जणांना आवडते गल्लीतील नगरसेवकापासून थेट अमेरिकेच्या प्रेसिडेंट ला ज्ञान पाजळायला येणारे जेव्हा एखाद्या ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांशी बोलायचे म्हटले तर 50 वेळा विचार करतात.
इयत्ता दहावीत शिकत असलेल्या एका रणरागिनीने मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांची गाडी अडवून जाब विचारला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामधील आपले कामकाज आटपून आमदार माने हे मतदारसंघांमध्ये दौरा करीत होते.
एका गरीब कुटुंबातील दहावी मध्ये शिकत असलेला धाडसी विद्यार्थिनीने आमदारांची गाडी अडवून थोडे बोलायचे असे सांगितले. आमदारांना देखील तिचे विशेष कौतुक वाटले. मोठ्या मनाने आलो असे म्हणत गाडीतून त्यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी विद्यार्थिनीने रस्ता खराब झाला असून खराब रस्त्यांमुळे काय काय अडचणीना गावकऱ्यांना समोरे जावं लागतं रस्त्यांमध्ये सुधारणा करून देण्याची मागणी केली.
माने यांनी देखील एका वर्षाच्या आत मध्ये रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन दिले यानंतर माने यांनी विद्यार्थिनीच्या धाडसाचे कौतुक केले आजच्या काळात आम्ही या वयामध्ये आमदारांच्या जवळपास देखील जात नसल्याचे सांगत विद्यार्थिनीने केलेल्या धाडसाचे कौतुक करत नाव विचारले लोकप्रतिनिधींना विकास कामासाठी जाब विचारला असे पहिल्यांदाच कोणी एका ग्रामीण भागातील रणरागिनीने आपले मत आपली समस्या आमदारांसमोर न डगमगता मांडली अनेकांनी तिच्या केलेला धाडसाचे कौतुक देखील केले आहे.दहावीच्या मुलीने आमदाराला अडवून काम करून घेतला चा व्हिडिओ मात्र व्हायरल होत आहे.