विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चाेत पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार केंद्रात आल्यानंतर संघाने पहिल्यांदाच आपली बाजू मांडण्यासाठी त्यांची प्रवृत्ती म्हणून नियुक्ती केली होती अतिशय शांत आणि ठामपणे ते आपली बाजू मांडत असत शेवटपर्यंत वैद्य यांचं लेखन वाचन सुरू होतं 1978 मध्ये ते विधानपरिषदेवर आमदार म्हणूनही निवडून गेले होते 1934 मध्ये ते संघांशी जोडले गेले त्यानंतर साध्या स्वयंसेवक का पासून ते संघाच्या उच्च वर्तुळा पर्यंत त्यांचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी होता