आज दि.14 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 669 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी 17 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.
आज मंगळवारी 14 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 669 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 415 पुरुष तर 254 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 399 आहे. यामध्ये 262 पुरुष तर 137 महिलांचा समावेश होतो. आज 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 3924 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3255 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Leave a Reply