नवी दिल्ली,दि.14 : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणारी रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. महाराष्ट्रात आज रात्री आठ पासून 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
देशातील कोरोनाचा वाढता कहर पाहता केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईं (CBSE) दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
परिस्थितीचा आढावा घेऊन बारावीच्या परीक्षांबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिक्षण मंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.