सोलापूर दिनांक – कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करताना माझ्यावर अनेक प्राणघातक हल्ले झाले.कामगारांनी त्यांचे प्राण पणाला लावून मला वाचवले म्हणून मला नामांकित पुरस्कार मिळाले.हे पक्ष कार्यकर्ता, पक्षाची सैद्धांतिक भूमिका आणि पोलादी शिस्त यामुळेच.यातून माझ्यासारखा कार्यकर्ता घडू शकतो म्हणून पक्ष वाढवणे हे माझे सर्वोच्च ध्येय आहे असे सत्काराला उत्तर देताना कॉ.आडम मास्तर म्हणाले.
बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी दत्त नगर लाल बावटा कार्यलय येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जेष्ठ नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशीप सोसायटी दिल्ली च्या वतीने भारत ज्योती पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने जाहीर स्वागत व सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी व्यासपीठावर अँड.एम.एच.शेख, रे नगर फेडरेशन चेअरमन कॉ.नलिनीताई कलबुर्गी, सचिव युसूफ मेजर शेख, नसीमा शेख,सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी,सिद्धप्पा कलशेट्टी, रंगप्पा मरेड्डी, प्रा.अब्राहम कुमार म.हनिफ सातखेड, यशोदा दंडी,अनिल वासम आदी उपस्थित होते.
या समारंभाचे प्रास्ताविक माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले.
यावेळी हुतात्मा कुर्बान हुसेन सहकारी गृहनिर्माण संस्था, कॉ.गोदूताई परुळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था, कॉ.मीनाक्षी साने सहकारी गृहनिर्माण संस्था,श्री स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्था, हुतात्मा रेडिमेड व शिलाई कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था, जाती अंत संघर्ष समिती, फुले शाहू आंबेडकर तथा अण्णाभाऊ साठे बहुउद्देशी संस्था,श्री.ओमप्रकाश समाल पंतुलु, डी.वाय.एफ.आय.एस.एफ.आय.अखिल भारतीय जनवादी महिला संघटना,माकप राहुल गांधी शाखा, दत्त नगर अशोक बल्ला मित्र परिवार,सोलापूर शहर ख्रिस्ती समाज संस्था, दाही हलीमा ट्रस्ट,सलीम मुल्ला मित्र परिवार आदींनी यथोचित सत्कार केले.