सोलापूर दिनांक – मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 14 एप्रिल पासून संचार बंदी आणि कोरोनाची प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध ची घोषणा केले.हे करताना नोंदणीकृत फेरीवाले रिक्षा चालक, बांधकाम कामगार घरेलू कामगार,आदिवासी,श्रावणबाळ,निराधार,दिव्यांग व अन्य काही घटकांसाठी अन्नधान्य व अनुदान राज्य सरकार मार्फत देण्याची तरतूद केली.वास्तविक पाहता ही तरतूद अत्यंत तुटपुंजी असून किमान 5 हजार रुपये दिले पाहिजे तसेच लाखोंच्या घरात असणारे विडी, यंत्रमाग आणि रेडिमेड शिलाई कामगारांना मात्र एक कवडी ची तरदूत केलेली नाही. सरकारच्या हा दुजाभाव चालणार नाही अशी टीका आडम यांनी केली. चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते कोरोनाच्या प्रादुर्भावाने मरण्यापेक्षा लढून मरणे अधिक पसंद करतील.असे ही ते म्हणाले.
जर विडी, यंत्रमाग व रेडिमेड शिलाई कामगारांना अन्नधान्य व किमान 5 हजार रुपये अनुदान तातडीने अदा करावे अन्यथा रस्त्यावरची लढाई अटळ आहे. असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
Leave a Reply