विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानसभेचे सदस्य आशिष शेलार, कॅप्ट. आर. तमिल सेल्वन, संजय केळकर, अनिल पाटील, बाळा भेगडे, राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक याचबरोबर विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेन्द्र भागवत, उपसचिव शिवदर्शन साठ्ये व राजेश तारवी उपस्थित होते.