महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात विविध शहरात, ग्रामीण पातळीवर ग्रंथ प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी प्रदर्शनस्थळी मान्यवरांनीही भेटी दिल्या. सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध शिव मंदिरांची स्वच्छताही करण्यात आली, तर काही मंदिरांमध्ये स्पिकरवर ॐ नम: शिवाय हा सामूहिक नामजप लावण्यात आला होता.
सनातनच्या साधना, बालसंस्कार, आयुर्वेद, वनस्पती लागवड, धर्माचरण, राष्ट्र आणि धर्म यांविषयी हजारो ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. या ग्रंथांचा जिज्ञासूंनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन दत्तात्रय पिसे यांनी केले.
Leave a Reply