Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH 13 News Network

सोलापूर दि.१६ :- बंजारा समाजाचे आद्यगुरू संत सेवालाल महाराज २८४ जयंतीनिमित्त गुरुवारी रोजी दुपारच्या सुमारास सात रस्ता येथील कारगीर पेट्रोल पंप उत्कर्ष हॉटेल येथून नेहरू नगर पर्यंत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

पारंपरिक बंजारा नृत्यसह, युवक-युवतींनी नाशिक ढोल तसेच डीजेच्या तालावर बहारदार खेळ सादर करीत शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी समाज बांधवानी जयघोषाने परिसर दणाणून सोडला.

जय सेवालाल महाराज यांच्या प्रतिमीचे पूजन प्रतिष्ठापना भोग लावून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश चव्हाण, अलका राठोड, अमोल (बापू) शिंदे, ऋतुराज बंटी राठोड, शिवाजी सावंत , रमेश चव्हाण, विनोद चव्हाण, मनीष काळजे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते जयंती साजरी करून सुरुवात करण्यात आले.

यावेळी शिवाजी सावंत यांनी बोलताना आपल्या मनोगतातून पुढच्या वर्षी जय सेवालाल महाराज जयंतीच्या वेळी बंजारा समाजातील पारंपरिक नृत्य व भजन या स्पर्धा आयोजित करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी जय सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती उत्सव अध्यक्ष संदीप राठोड यांनी संत सेवालाल महाराजा विषयी त्यांच्या कार्याविषयी विचार मांडले .

यावर्षी जय सेवालालच्या जयंती निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राठोड यांनी राबविले. तसेच मुळेगाव, नेहरू नगर, कवठे तांडा भागातील १५ लमाण तांड्यातील बंजारा समाज बांधवांचा मोठया संख्येने जयंतीमध्ये सहभागी झाले.

यावेळी मिरवाणुकीचे मार्ग सातरस्ता- कंबर तलाव- विजापूर नाका मार्ग नेहरू नगर येथील बंजारा भूषण व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या पुतळया जवळ मिरवणुकीचे समारोप करण्यात आला.

हलगीच्या तालावर बंजारा नृत्य

रंगेबीरंगी वाद्य व बंजारा वेशभूषा परिधान केलेल्या उत्सवचे अध्यक्ष संदीप राठोड यांनी मुळेगाव तांडा व नेहरू नगर येथील लहान चिमुकल्या मुलींनी आणि महिलांनी हलगीच्या तालावर एकत्र येऊन जय सेवालाल बंजारा नृत्य सादर करून आपल्या पारंपरिक कलेचा अविष्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *