भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती उद्या १७, १८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर

Big9 News

भारतीय प्रेस परिषदेच्या (कौंन्सिल) शोध समितीची बैठक उद्या १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृह, मुंबई येथे होणार आहे.

न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली राहील, असे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.