Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

 

सोलापूर – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आज ४० दिवसाच्या मसुरी येथील प्रशिक्षण कालावधीत संपवून प्रदीर्घ कालावधी नंतर आज जिल्हा परिषदेमध्ये रूजु झाले. योगायोगाने त्यांचा आज वाढदिवस होता. आज शनिवार व रविवार कार्यालयीन कामकाज असलेने जिल्हा परिषद सुरू आहे. या धावपळीतून वेळ काढत त्याना सुरक्षा पोलिस कर्मचारी दुधाळ यांनी अपंग अभ्यागत मनोज भोजराज टोणे हे भेटणे साठी आले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांचे निदर्शनास आणून दिले. या प्रसंगी सिईओ स्वामी यांनी अपंग टोणे यांनाच जागेवर भेटणे साठी येतो असा निरोप देऊन खुर्चीवररून उठून तडक ते अपंग टोणे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतले. टोणे हे इलेक्ट्रीक व्हील चेअर ची मागणी निवेदना द्वारे केली. समाज कल्याण अधिकारी खमितकर यांना स्वत चे मोबाईल वरून फोन करून टोणे यांची समस्या सोडविणे बाबत सुचना दिले.

सिईओ दिलीप स्वामी जिल्हा परिषदे मध्ये रूजु ..!


प्रशिक्षण कालावधी संपले नंतर आज सिईओ दिलीप स्वामी जिल्हा परिषदे मध्ये रूजू होऊन त्यांनी प्रभारी सिईओ संदीप कोहिनकर यांचे कडून पदभार घेतला. या प्रसंगी प्रभारी सिईओ संदीप कोहिणकर यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शासनाचा निधी वेळेत खर्च करा- सिईओ दिलीप स्वामी

सिईओ दिलीप स्वामी हे आज जिल्हा परिषदे मध्ये रूजु झालेनंतर त्यांनी विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेऊन ३१ मार्च पुर्वी निधी खर्च करणे बाबत सुचना दिले.

केंद्र व राज्य शासना कडून प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करा. जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा परिषद सेस अंतर्गत मंजुर कामे वेळेत पुर्ण करा अशा सुचना आज सिईओ दिलीप स्वामी यांनी आज आढावा बैठकीत विभाग प्रमुख यांना दिल्या. या आढावा बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे हस्ते सिईओ दिलीप स्वामी यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करून रूजू झाले बद्दल त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, अतिरिक्त लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता खरात, शिक्षणाधिकारी संजय जावीर, आरोग्य अधिकारी डाॅ. सोनल बागडे, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, कास्ट्राईब चे अरूण क्षीरसागर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक चंद्रकांत होळकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *