शिवसंपर्कानंतर आता शिवसेनेचे शिवसंवाद अभियान
पुरुषोत्तम बरडेंच्या नेतृत्वाखाली नियोजन बैठक संपन्न
सोलापूर – पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता मजबूत पक्षबांधणी होण्याच्या दृष्टीने शिवसंवाद अभियान राबविण्यात येत असून जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन पुढील नियोजन करण्यात आले.
यापूर्वी शिवसंपर्क अभियानाला शहर व जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्याचा अहवाल पाहून कौतुक केले होते. आत्ताही त्याचप्रमाणे कामाची विभागणी करत पक्षबांधणी मजबूत होण्याकरिता सर्वांनी आपापल्या स्तरावर प्रामाणिकपणे काम करुन जास्तीतजास्त लोकांना पक्षासोबत जोडावे, पक्षाचे विचार प्रत्येक घरापर्यंत सहजतेने पोहचविता येतील अशी स्थानिक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे असे मत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मांडले. याप्रसंगी सोलापूर शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, शहर उत्तरचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दक्षिणचे उपजिल्हाप्रमुख अमर पाटील (ग्रामीण) व भीमाशंकर म्हेत्रे (शहर), शहर मध्य विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, अक्कलकोट उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, तालुका प्रमुख संजय देशमुख, योगिराज पाटील, अक्कलकोट शहरप्रमुख मनोज पवार, उपतालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, महेश धाराशिवकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख निरंजन बोध्दुल, सैदण्णा जंगडेकर व रेवण पुराणिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोवीड नियमांचे पालन करीत खालीलप्रमाणे विधानसभा मतदारसंघातील मोजक्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
बुधवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकोट विधानसभा बैठक अक्कलकोट मध्ये होईल तर याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता दक्षिण सोलापूर (ग्रामीण) तर संध्याकाळी ६ वाजता दक्षिण सोलापूर (शहर विभाग) पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे घेण्यात येईल. रविवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. शहर उत्तरची तर मंगळवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. शहर मध्य मधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल.
या शिवसंवाद अभियानाचा अहवाल शिवसेनेचे चारही सचिव सर्वश्री खा. अनिल देसाई, खा. विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण व राज्य समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या समोर सादर केला जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले.
बैठकीच्या यशस्वीतेकरिता राज पांढरे, बसवराज जमखंडी, रविकांत गायकवाड व सुशील कन्नुरे आदींनी परिश्रम घेतले.
शिवसेनेचा शेला गळ्यात घालत तरुणांनी केला पक्षप्रवेश
होटगी रोड कल्याण नगर येथील तरुणांनी महेश गिराम यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना प्रवेश केला. तर मंद्रुप भाजपा शहर अध्यक्ष संतोष बरुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल सर्व नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचाही सत्कार करण्यात आला.
Leave a Reply