Big9news Network
भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर शहरात दिनांक 10 जानेवारी पासून हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स आणि 60 वर्षे वयावरील सह व्याधीग्रस्त व्यक्तींसाठी वर्धक मात्रा (booster dose) देण्यात येणार आहे.
1.ज्या हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व 60 वर्षे वयावरील सहव्याधिग्रस्त व्यक्तींनी दोन्ही डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले आहेत अशा व्यक्तींनी वर्धक मात्रा अवश्य घ्यावी.
2.पूर्वीचे दोन डोस ज्या लसीचे घेतले आहेत, त्याच लशीची वर्धक मात्रा घेणे आवश्यक आहे.
3.संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वर्धक मात्रा अवश्य घ्यावी
4.मनपा अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मनपा प्रांगणात covid कंट्रोल रूम मध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
5.मनपाच्या 14 नागरी आरोग्य केंद्रामध्ये,रेल्वे हॉस्पिटल,ESIS हॉस्पिटल, SRPF कॅम्प व सिविल हॉस्पिटलमध्ये *18 वर्षे* वयावरील *सर्व* नागरिकांना *covishield* लसीचा पहिला, दुसरा डोस तसेच booster dose साठी online, onspot पद्धतीने नोंदणी करता येईल.
6.उर्वरित सर्व केंद्रावर 15 वर्षे वयावरील सर्व नागरिकांना covaxin लसीचा पहिला डोस, दुसरा डोस व booster dose ऑनलाइन तसेच onspot नोंदणी करून घेता येईल.
7.booster dose घेण्यासाठी HCW, FLW यांनी आपले कार्यालयीन ओळखपत्र तसेच दोन dose घेतलेले सर्टिफिकेट अथवा beneficiary code जवळ ठेवावा.
आधी ज्या मोबाईल नंबरने registration केले आहे, तोच numbar सांगावा.
8.दोन डोस घेतल्या नंतर covid 19 आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास 3 महिन्यानंतर booster डोस घ्यावा.
9. 60 वर्षे वयावरील सहव्याधिग्रस्त व्यक्तींनी booster डोस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांची संमती घेणे गरजेचे आहे.त्यासाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे नाही.
10. Booster डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे ,हातांची स्वछता व गर्दी करणे टाळणे या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.
Leave a Reply