Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान आणि स्वामीजीनी ज्या आदर्शां साठी जीवन व्यतीत केले, आणि कार्य केले ते भारतीय युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात असे भारत सरकारने नमूद केले आहे, आणि ते खरे देखील आहे. १२ जानेवारी, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस, हा भारतात “राष्ट्रीय युवा दिन” म्हणून साजरा होतो. या निमित्ताने थिंकट्रान्स फाऊंडेशन, पुणे, यांनी एक “स्टार्टअप आयडिया मॅरेथॉन” म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा – “आयडिया टू मार्केट”,- खास सोलापुरातील युवकांसाठी आयोजित केलेली आहे.

या स्पर्धेअंतर्गत युवकांनी आपल्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप आयडियांची थिंकट्रान्स फाऊंडेशनच्या “कामतकर क्लासेस, जुना एम्प्लॉयमेंट चौक” अथवा “विद्या कॉम्प्युटर्स, जुळे सोलापूर” यापैकी कोणत्याही केंद्रात १५ जानेवारी २०२२ च्या आत नोंदणी करावयाची आहे.

विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले आहेत – 

  • अभिमन्यू गट : ६वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी
  • अर्जुन गट: व्यावसायिक डिप्लोमा/पदवी मधील विद्यार्थी
    या स्पर्धेत प्रत्येक आयडिया हि नावीन्यपूर्णता व व्यावहारिकता या मूल्यांवर तपासली जाऊन प्रत्येक गटातील पहिल्या तीन आयडियांना पारितोषिक व योग्य मूल्यांकनानंतर त्या आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारा सपोर्ट हा फाऊंडेशन मार्फत दिला जाणार आहे. या स्पर्धेमागील उद्देश हा सोलापूर जिल्ह्यामधील युवकांमध्ये स्टार्टअप हि संकल्पना रुजावी आणि या मधून भावी उद्योजक तयार व्हावेत हा आहे. सोलापुरातील प्रतिभा सोलापूरात रहावी आणि वृद्धिंगत व्हावी यासाठी थिंकट्रान्स फाऊंडेशन गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे व या संदर्भातील संवाद एकत्रित व्हावे म्हणून सोशल मीडियासाठी #ISupportSolapurStartup आणि #SakshamSolapur हे दोन हॅशटॅग देखील फाऊंडेशन द्वारे सुरु केले गेलेले आहेत.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी, इच्छुक विद्यार्थ्यांनी 9923653334 अथवा 9822448890 वर मेसेज करावा अथवा स्टार्टअप आयडिया team@thinktrans.in वर ई-मेल करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *