Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

एसी,कुलर,सोने व हुंडा पाहिजे, असा आग्रह करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती- अशपाक घुडूभाई मुल्ला,सासू- काजल मुल्ला,सासरा- घुडूभाई राजेभाई मुल्ला, ननंद-रुबीन मुल्ला, नंदेचा पती-नबीलाल जमादार(सर्व रा. खतीब कॉम्प्लेक्सजवळ, मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

नसरीणबानो अश्पाक मुल्ला.(वय ३९ रा. शास्त्रीनगर, मदिना हॉटेलसमोर) यांचा विवाह दि.३० ऑगस्ट २०१९ रोजी रोजी अशपाक मुल्ला यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर एक महिना व्यवस्थित नोंदवले. त्यानंतर विनाकारण भांडण काढून शारीरिक व मानसिक (Physical and mentaly) छळ करण्यास सुरुवात केली.

नशिबाने मुल्ला यांना दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा (Crime) दाखल झाला असून तपास पोलिस नाईक रूपनर करीत आहेत. दरम्यान, हुंड्यासाठी (Dowry) छळ होण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत असून त्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *