आ. सुभाष देशमुख यांची थेट अधिवेशनात तक्रार
सोलापूर (प्रतिनिधी )
पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच गाजला. अनेक वादग्रस्त मुद्दे बुधवारी उपस्थित करण्यात आली आहे. आ. सुभाष देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगरमधील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचं चित्र असणारं पेपरवेट दाखवून चाळे करत असल्याची तक्रार करत संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करावे अशी मागणी केली आहे.
संभाजीनगर मधील महावितरण अधीक्षक अभियंता प्रविण मारुतीराव दरोली या त्याच्या कार्यालयात नग्न महिलेचं चित्र काढलेलं पेपरवेट ठेवलं आहे. त्या ठिकाणी महिला अधिकारीही आहेत.
महिला अधिकाऱ्याला वारंवार बोलावून हे पेपरवेट दाखवतो. तसेच या पेपरवेटवरून टिंगल करतो आणि अश्लील चाळे करतो, अशी तक्रारीचा मुद्दा अधिवेशनातआ. देशमुख यांनी मांडला.
तसेच, या महिलेने जानेवारी-फेब्रुवारीपासून हे चाळे सुरू असताना नाईलाजाने आता तक्रार दाखल केली आहे. याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे” अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संबंधित तक्रारीची नोंद घ्यावी आणि कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
Leave a Reply