Big9 News
लग्नकार्यासाठी पूर्वतयारीस घराकडे निघालेल्या शेतमजुराच्या दुचाकीला भर धाव वेगातील मालवाहू टेम्पो ने उडवले
त्यामध्ये पाच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नगर कल्याण महामार्गावर आळी परिसरातील लवणवाडी येथे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली आहे मृतात दोन चिमुरड्यांचा समावेश आहे.
नितीन शिवाजी मधे, सुनंदा रोहित मधे,गौरव रोहित मधे, आर्यन सुहास मधे,यमा मधे, ठमा मधे असून हे सर्वजण पारनेर तालुक्यातील पळशी नागापूर वाडी येथील एकाच कुटुंबातील आहेत. अपघातानंतर मोठा आवाज आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली त्यानंतर आळेफाटा पोलिसी दाखल झाले. अपघाताचे हृदय द्रावक दृश्य पाहून सर्वजण गहिवरले. अर्चना मधे असे जखमीचे नाव आहे. टेम्पोचालक मयूर संतोष आनंद रा.कळस ता.पारनेर यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व जखमी एकाच दुचाकीवरून जात होते मात्र दुचाकीवरून इतके जण कसे प्रवास करू शकतील असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे तपासानंतर अनेक गोष्टी समोर येतील, असे पोलिसांनी सांगितले आहे.