उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ राज… भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटलांच्या समर्थकांकडून योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून मिठाई वाटून केला जल्लोष
सोलापूर:—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात तेथील जनतेने भरघोस असा कौल देऊन पुन्हा उत्तर प्रदेशच्या सत्तेवर योगी आदित्यनाथ हे विराजमान होणार आहेत. दरम्यान आज उत्तर प्रदेश चा निकालाची सुरुवात झाली यामध्ये उत्तर प्रदेश मधील मतदार राजांनी योगी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाला मान्य केली आहे.
अखंड हिंदुत्वाचा नारा देणारे योगी आदित्यनाथ विजयाचा जल्लोष करण्यासाठी प्रभाग क्रमांक तीन मधील भवानी पेठ परिसरातील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयात समोर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून ढोल ताशाच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, शहर सरचिटणीस शशिकांत थोरात, विजय पुजारी, युवा नेते बिपीन पाटील, शक्ती प्रमुख विजय कोळी, बूथ प्रमुख शिवा हक्के, महेश गोरखल, शिवपुत्र मंदकल, प्रवीण कैरमकोंडा, काशिनाथ होटकर, श्रीनिवास कोंतम, नवीन जिट्टा, विजय गोरकल, रवी मंदकल, प्रकाश साळुंके, कांतु गलक, आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.
राजनीति मेरा पेशा नहीं है हिंदुत्व मेरा मिशन है या उक्तीप्रमाणे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाला मान्य करीत उत्तर प्रदेश मध्ये भाजपची विजय झाला आहे, उत्तर प्रदेश मध्ये परत जनतेने योगी आदित्यनाथ राजला मतदारांनी कौल दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेवून यांच्या नेतृत्वाला मान्य करीत उत्तर प्रदेश मध्ये भाजपाची सत्ता आलेले आहेत अन्य राज्यांमध्ये देखील भाजपची विजयाची मार्ग मोकळे झाले आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला.
Leave a Reply