शहर | कोरोना रुग्णांची झाली वाढ ; एकाचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरात आज १५१५ कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १४९७ निगेटिव्ह आहेत तर १८ जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनाने दिली आहे. यामध्ये दहा जण पुरुष असून आठ जण महिला आहेत.

अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
शहरातील विविध रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधित रुग्णांची संख्या 16 असून त्यामध्ये नऊ पुरुष तर सात महिलांचा समावेश होतो.

सोलापूर शहरात रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 95 यामध्ये 45 पुरुष तर पन्नास महिलांचा समावेश होतो.
मयत झालेली व्यक्ती बालाजी नगर, कुमठा नाका परिसरातील 63 वर्षांचे पुरुष असून 19 जुलै रोजी दुपारी त्यांना अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 30 जुलै रोजी दुपारी त्यांचे निधन झाले त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.