महेश हणमे /9890440480
सोलापुरातील कडक निर्बंध शिथिल कधी होणार याची चर्चा सर्वत्र होती .यावर आता विराम लागणार आहे. कारण उद्या सोमवारी किंवा मंगळवारी सोलापुरातील कडक निर्बंध शिथिल होतील अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांना फोनवर बोलताना दिली.
शहरातील पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. त्यामुळे बोटावर मोजता येणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे संपूर्ण शहर वेठीस धरले आहे, अशी भावना व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत तसेच शनिवारी व रविवारी दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे,तर अर्थचक्र बंद पडल्याची भावना अनेक व्यापारी संघटनांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज गटनेता चंदनशिवे यांच्याशी बोलताना सोमवारी किंवा मंगळवारी निर्बंध शिथिल होतील अशी ग्वाही दिली .त्याच सोबत ही माहिती व्यापाऱ्यांना कळवा असेही सांगितले.
आज रविवारी रात्री आठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असून ते कोणती घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दुकाने आधी प्रमाणे सुरू राहतील. अशी घोषणा आजच केली आहे. त्यामुळे सोलापूरकर यांचे लक्ष लॉकडाऊन कधी उठणार त्याच्याकडे लागले होते.
Leave a Reply