Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

BIG 9 NEWS NETWORK

७ ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. पद्मशाली समाज व युवक संघटनेच्या वतीने शहरातील विणकर बाग येथील
विणकर पुतळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते सुताचा हार आणि पुष्पहार घालून राष्ट्रीय विणकर दिन साजरा करण्यात आले.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम,सभागृह नेते शिवानंद पाटील ,माजी विरोधी पक्षनेते महेश अण्णा कोठे यांच्या हस्ते उपस्थिती असलेल्या 5 हातमाग कामगारांना सन्मानित करून शुभेच्छा देण्यात आले.यावेळी प्रास्ताविक अशोक इंदापुरे,यांनी केली.यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या सबंध देशात हातमाग कामगारांच्या हाताला काम नसल्याने कामगारांच्या चिंता वाढत आहे. भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर येणा-या पिढीला हातमागाचे साहित्य संग्रहालयात बघावे लागेल. हातमाग कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी हातमागावरील तयार होणाऱ्या वस्त्रे वर्षातून किमान पाच ते सहा वेळा खरेदी करून परिधान करावे, त्यामुळे उद्योगना चालना मिळेल असे आवाहन सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम केले.यावेळी माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी हातमागासाठी शासनाने अनेक योजना उद्योगासाठी दिले आहे.हातमाग वस्त्रे प्रत्येकाने वापरले पाहिजे. दरवर्षी हातमागावरील किमान दोन उत्पादने खरेदी करून हातमाग व्यवसाय वृध्दीला हातभार लावण्याचा संकल्प करुया.वर्षातून दोन ते तीन वेळा जरी हातमागचे वस्त्रे विकत घेतली तरी या हातमागला उर्जितावस्था मिळाले.हातमाग कामगारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक महेश कोठे, नगरसेविका सोनाली मुटकेरी, नगरसेविका प्रतिभा मुदगल, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिंडी, इंदिरा कुडक्याल, विजयाताई वड्डेपल्ली, सुरेश फलमारी,श्रीनिवास गुर्रम, अजय दासरी, ज्ञानेश्वर म्याकल, सिद्धारूढ निंबाळे, पुरुषोत्तम पोबत्ती, नागेश सरगम,जाकिर सगरी, सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापूरे म्हणाले, वेळी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल, सचिव शेखर कटकम नितिन मार्गमझ सतिश चिटमिल, माजी अध्यक्ष गिरीष कोटा, रविंद्र गड्डम,अमर येरपूल आनंद गोसकी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *