सुशीलकुमार, ‘सुशील’नाव असणाऱ्यांना सोलापुरात फुकट पेट्रोल..

सुशीलकुमार व सुशील नाव असणाऱ्यांनो तुमच्यासाठी खुशखबर ; 4 सप्टेंबरची आहे विशेष ऑफर

सोलापूर – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस येत्या चार सप्टेंबर रोजी आहे .यानिमित्ताने यशदा युवती फाउंडेशनच्यावतीने ४ सप्टेंबर रोजी सुशीलकुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर मोफत देण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोस पटेल यांनी दिली.
सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी सुशीलकुमार किंवा सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींनी ओळखीसाठी येताना सोबत आपले आधारकार्ड आणावयाचे आहे.त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ट नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले,गटनेते चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.


देशात आज दिवसेंदिवस पेट्रोलचे दर कमालीचे वाढू लागले आहेत.सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्या आहेत.

फिरदोस पटेल

.इंधनाचे दर वाढत चालले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र सामान्य माणसाचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही.त्यामुळे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम म्हणून मोफत पेट्रोल वाटप करणार असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.