Latest Post

10+ Best Crypto As Well As Bitcoin Craps Casinos June 2024 Top 10 Mobile Casinos Real Money Game Titles In 202

MH 13 News Network 

🔶अक्कलकोट : (प्रतिनिधी)
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे सुरेशचंद्र सूर्यवंशी, शामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संयोजक अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव – २०२३ साजरा करण्यात येणार असून, रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी भव्य शिव मूर्तीची प्रतिष्ठापना व शिवरायांचा पाळणा कार्यक्रम आणि मंगळावर दि. २१ फेब्रुवारी रोजी  शिव छत्रपतींची भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाचे उत्सव अध्यक्ष निखील पाटील यांनी दिली आहे.

        सालाबादप्रमाणे यंदाही युवक मंडळाच्या वतीने रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. भव्य शिव मूर्तीची प्रतिष्ठापना व शिवरायांचा पाळणा कार्यक्रम श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरातील विविध महिला मंडळ भगिनींच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

       मंगळावर दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. शिव छत्रपतींची भव्य मिरवणूक खासदार डॉ.जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, माजी गृह राज्यमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे, न.प.मुख्याधिकारी सचिन पाटील, शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल (बापू) शिंदे, सो.म.पा.माजी उप महापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, उत्तर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, सोलापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, उप कार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे (वितरण कंपनी), सकल मराठा राज्य समन्वयक माऊलीभाऊ पवार, माजी शिक्षण सभापती संकेत पिसे, सो.म.पा. माजी परिवहन सभापती राजनभाऊ जाधव यांच्या शुभहस्ते मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.

          या मिरवणुकीस श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे मुख्य पुजारी मंदार महाराज पुजारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, माजी विरोधी पक्ष नेते अशपाकभाई बळोरगी, जि.प.माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी पक्ष नेता महेश हिंडोळे, शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोहर मोरे, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजीवकुमार पाटील, माजी जि.प.सदस्य आनंद तानवडे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ माने, जय हिंद शुगरचे अध्यक्ष बब्रुवान माने-देशमुख, जेष्ठ विधिज्ञ अॅड.शरद फुटाणे, विधिज्ञ अॅड.संतोष खोबरे, पंचरत्न फायनान्सचे अध्यक्ष लाला राठोड, माजी नगरसेवक रईस टिनवाला, मुस्लीम समाज संघटनाचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड,  रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष  सुनिल बंडगर, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, माजी उप सभापती सिद्धार्थ गायकवाड, व्यापारी महा संघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, माजी प.स.सदस्य बाळासाहेब मोरे, प्रसिद्ध उद्योगपती अभिनंदन गांधी, अॅड. विजय हर्डीकर, प्रसिद्ध उद्योगपती विलासराव कोरे, डॉ.आर.व्ही.पाटील, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, हॉटेल व्यवसायीक सिद्धेश्वर मोरे, उद्योगपती काशिनाथ गोळ्ळे, सुनील गोरे, दिनेश पटेल, अनुलोमचे राजकुमार झिंगाडे, उद्योगपती मधुकर सुरवसे, हॉटेल विकास ग्रुपचे महिबूब शेख, उद्योगपती प्रमोद गोरे, अक्कलकोट बाजार समितीचे माजी उप सभापती अप्पासाहेब पाटील, समाजसेवक शिवराज स्वामी, उद्योगपती विनायक बुधले, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, समाजसेवक सुभाष पुजारी , माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, श्री स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष राजशेखर हिप्परगी, उद्योगपती अप्पू पराणे, बसवराज माशाळे, बंजारा समाजाचे नेते ऋतुराज (बंटी) राठोड, सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन कोरबू, बॉन्ड राईटर शकील पठाण, माजी नगरसेवक राम समाणे, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील, नन्नु कोरबू, आनंद पवार, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष तम्मा (मामा) शेळके, सामाजिक कार्यकर्ते शबाब कोरबू, दीपक जरीपटके, प्रा.शिवशरण अचलेर, अलीबाशा अत्तार, मातंग समाज सुनिल खवळे, दयानंद रोडगे, नागराज कुंभार, वडार समाजाचे तालुका अध्यक्ष अंकुश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते अकिल बागवान, माजी सरपंच प्रदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते पिंटू सोनटक्के, भाजपा शहर सरचिटणीस बाळासाहेब शिंदे, लोकमान्य चे सिध्दाराम टाके, सामाजिक कार्यकर्ते मल्लिनाथ करपे, प्रहारचे अमर सिरसट, माजी सरपंच प्रदीप जगताप, उद्योगपती चंद्रकांत इंगळे, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, भाजपा युवा मोर्चाचे ऋषी लोणारी,  सामाजिक कार्यकर्ते सतीश सिरसट, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश पवार, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, भारिप तालुकाध्यक्ष संदिप मडीखांबे, मोट्याळ सरपंच कार्तिक पाटील, चुंगी माजी सरपंच दिलीप काजळे, सांगावी सरपंच बाळासाहेब भोसले, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सिद्धाराम माळी, सामाजिक कार्यकर्ते किसन जाधव, अरुण विभूते, लहूजी सेना अध्यक्ष वसंतराव देडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल धुमाळ, माजी सरपंच अमर पाटील, सरपंच उमेश पाटील, माजी सरपंच सुरेश चव्हाण, प्रगतशील शेतकरी विवेक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुधीर सोनकवडे, छत्रपती प्रतिष्ठानचे गणेश गोब्बुर, चुंगीचे राजू चव्हाण, कुरनुरचे सरपंच व्यंकटराव मोरे, सामाजिक कार्यकर्ते रवी वरनाळे, माजी सरपंच सतीश पवार, उद्योगपती विश्वनाथ भरमशेट्टी, चुंगी उप सरपंच महादेव माने, पोलीस पाटील संघटनेचे रहिमान शेख, सामाजिक कार्यकर्ते लखन झंपले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार असल्याची माहिती युवक मंडळाचे उत्सव उपाध्यक्ष बालाजी पाटील यांनी दिली आहे. तरी या कार्यक्रमास शहर तालुक्यातील शिव प्रेमी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहान युवक मंडळ उत्सव सचिव अनिकेत सोनटक्के व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *