Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9News Network

सिद्धार्थ कंक : ५१ मंडळांना शिवमूर्तींचे वाटप

महाराष्ट्रात सर्वत्र शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते. शिवजयंतीची ही भव्यता महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये नेण्यात नगरसेवक सुनील कामाठी यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन स्वराज्याचे सरसेनापती सरनोबत येसाजी कंक यांचे थेट १४ वे वंशज सिद्धार्थ कंक यांनी केले.

खड्डा तालीम शिवजयंती मंडळातर्फे नगरसेवक सुनील कामाठी यांच्यावतीने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या चार राज्यातील शिवजयंती मंडळांना शिवमूर्तींचे वाटप श्री. कंक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर महापौर श्रीकांचना यन्नम, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड, नगरसेविका प्रतिभा मुदगल, नगरसेवक भारत बडुरवाले, रवी कैय्यावाले, माजी परिवहन सभापती राजन जाधव, भाजपा शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, दशरथ कसबे, संगायो अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती, माजी नगरसेविका विजया वड्डेपल्ली, लहू गायकवाड, सुनील गौडगाव, चंद्रकांत धोत्रे, महेश अलकुंटे, बाळासाहेब गायकवाड, नारायण मोरे आदी उपस्थित होते.

सिध्दार्थ कंक म्हणाले, कंक घराण्याला चार छत्रपतींचीची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. श्री रायरेश्वराची शपथ, अफजल खान वध, कुतुबशहाच्या दरबारातील हत्तीची झुंज अशा अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये सरसेनापती येसाजीराव कंक यांची भूमिका निर्णायक होती. अफजलखान वधासारख्या अत्यंत महत्वाच्या लढाईत सरसेनापती येसाजी कंक साक्षीदार व सहभागी होते, याचा कंक घराण्याला अभिमान आहे. खड्डा तालीमच्या माध्यमातून नगरसेवक सुनील कामाठी हे शिवजयंती मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असेही श्री. कंक यावेळी म्हणाले.

माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य भारताचे भाग्य बदलवणारे ठरले. परकियांच्या गुलामगिरीतून भारताची सुटका करून त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे घराघरात आपण शिवजयंती साजरी करत आहोत. शिवजयंती महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणावर साजरी व्हावी, यासाठी नगरसेवक सुनील कामाठी प्रयत्न करीत आहेत, याचा आनंद आहे.

संयोजक नगरसेवक सुनिल कामाठी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी तर आभार प्रदर्शन उत्सव अध्यक्ष आकाश येळणे यांनी केले.

तलवारीच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी –

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती सरनोबत येसाजी कंक यांनी वापरलेल्या तलवारीचे दर्शन सोलापूरकरांना व्हावे यासाठी ती तलवार कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आली होती. या तलवारीचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *