सोलापूर–सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिनानिमित्त इंद्रभवन परिसरात आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या समवेत आयुक्त व उपमहापौर आणि अधिकारी यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था निमित्ताने प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी उपमहापौर राजेश काळे आयुक्त पि.शिवशंकर, उपायुक्त एन.के.पाटील उपायुक्त धनराज पांडे, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, सहाय्यक आयुक्त पुष्पगंध भगत, सहाय्यक आयुक्त महानवर, नगर अभियंता संदीप कारंजे, अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे, जनसंपर्क अधिकारी रुउफ बागवान,आरोग्याधिकारी अरूंधती हराळकर, प्रशासन अधिकारी कादर शेख, आयुक्त यांचे पी.ए राहुल कुलकर्णी, कार्यालयीन अधीक्षक युवराज गाडेकर, सुरेश लिंगराज, शेखर सकट, भास्कर सामलेटी तसेच अधिकारी,कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.