वसई : राज्यावर पुन्हा एकदा संकटाचे सावट आले आहे. रुग्णांच्या वाटेला रोज नवीन नवीन संकटे येत आहेत.आज पुन्हा एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. विरार येथील covid-रुग्णालयात भीषण आग लागल्याने तेरा रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
केवळ दोनच दिवसांपूर्वीची नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विरारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (13 patients have died in the fire at Virar Covid hospital fire broke out)
पालघर जिल्ह्यातील विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये ही आग लागली.या रुग्णालयात असलेल्याा कोविड सेंटर ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.
Leave a Reply