कोरोना चाचणी करून घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने जाहीर केली लॅब व हॉस्पिटलची यादी

 

सोलापूर,दि.9 : सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील 95 हॉस्पिटल व 5 खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. (The municipal administration has announced a list of labs and hospitals for corona testing).

कोरोना चाचणी करण्याकरीता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आलेले लॅब व हॉस्पिटल शहरांमधील पाच प्रायव्हेट लॅब आहेत. त्यामध्ये मेट्रो पॉलिसी लॅब मो-9096131472, कृष्णा लॅब मो-7741918857, अपोलो लॅब मो-8830843940, इनोवेशन इंडिकेट लॅब मो-9359217835, थायरो केअर लॅब मो-9021509143 6 या नंबरवरून संपर्क करू शकता. असे महापालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

त्यांच्याकडे या तपासणी केल्यास RTPCR तपासणी 500 रुपये व घरी तपासणी केल्यास 800 रुपये घेण्यात येत आहेत. असे 5 लॅब मधून RTPCR तपासणी केली जात आहे. तसेच सोलापूर शहरात रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणीसाठी शहरातील 95 हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली आहे.

हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यास 150 रुपये घेतले जातील. तसेच घरी येऊन तपासणी केल्यास 300 रुपये घेण्यात येत आहे हे दर शासनाने ठरवले आहे. तरी सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे महापालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.