Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाऊंडेशन) तसेच वुमेन्स रिसर्च फोरम च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा नारीशक्ती सन्मान पुरस्कार श्रीम. विद्या वरडुळे- खेडकर, उपशिक्षिका जि. प. शाळा, केगाव, तालुका- उत्तर सोलापूर, यांना देण्यात आला.
दिनांक – 1 एप्रिल रोजी शिवदारे कॉलेज येथे जिल्हा परिषद CEO श्री. दिलीपजी स्वामी साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला. या कार्यक्रमास सकाळचे मुख्य संपादक श्री. अभय दिवाणजी, तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी अग्रजा चिटणीस, हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

 

विद्या वरडूळे- खेडकर यांची सेवा 14 वर्ष झाली असून विद्यार्थी हेच दैवत मानून त्यांनी आजवर शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य केलेले आहे. शिक्षिका म्हणून काम करत असतानाच प्रथमवर्षी त्यांचा विद्यार्थी सातवी स्कॉलरशिप साठी पात्र झाला. त्यानंतर प्रत्येक वर्षी जसा वर्ग मिळेल त्याप्रमाणे विद्यार्थी ITS, MTS, स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षांमधून गुणवत्ता यादीत येत असतात. याचे गमक पाढे व स्पेलिंग पाठांतर असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांना पारावरची शाळा, online अध्यापन, प्रत्यक्ष गृहभेटी याद्वारे अध्यापन केले. केगाव शाळेत विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हि गंभीर समस्या होती. त्यामुळे शाळेला दांडी मारून शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “टीचर ला विद्यार्थ्यांशिवाय शाळेत नाही करमत, चला बाळांनो जाऊया शाळेत, करूया खूप अभ्यास आणि गंमत-जंमत” हा उपक्रम रोज अखंड चालूच आहे. याअंतर्गत रोज दारोदारी जाऊन विद्यार्थी शाळेत बोलवून आणावे लागतात. त्रासदायक असले तरी याचा फायदा असा झाला कि, शाळेत 100% उपस्थिती आता रोज असते. विद्यार्थी आनंदाने शाळेत येतात. एकही मूल शैक्षणिक प्रवाहाबाहेर जाणार नाही, अशी काळजी आजवर त्या घेत आलेल्या आहेत. इतकी प्रतिकूल परिस्थिती असतानाही विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत कला व क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरापर्यंत बाजी मारून जि. प. प्रा. शाळा, केगाव, चे नाव यंदा जिल्ह्यात गाजवले. तसेच सामाजिक बांधिलकी समजून दरवर्षी वटपौर्णिमेला इतर अंधश्रद्धांना फाटा देत वडाचे एक झाड अशी एकूण 7 झाडे त्यांनी लावली व ती जगवली आहेत.
सदर कार्यक्रम उत्कृष्ठ होण्यासाठी सर फाऊंडेशन चे सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा वाघ, नवनाथ शिंदे, राजकिरण चव्हाण, अनघा जहागीरदार आदींनी कडी मेहनत घेतली.
याप्रसंगी शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे सर, अनिरुद्ध पवार, राम म्हमाणे, अनिल थोरबोले,शुभांगी पवार, शिवाजी वडते आदींनी उपस्थित राहून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *