Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

 

मुंबई, दि. २९ : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक  देत आहोत.  अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत  त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

               मंत्रालयात आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. 

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीराज्यात  १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक‘ धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी,अशासकीय स्वयंसेवी संस्था,ट्रस्ट इ. आणि व्यक्ती,कुटुंब आणि  समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. आज दालमिया फांउडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाड्या दुरूस्तीसाठीभागीरथी फांउडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्तीसाठी, कॉरबेट फाउंडेशन पुणे येथे १६ अंगणवाड्या दुरूस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षणयुनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धीआर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील  २५ अंगणवाडी बळकटीकरणहोप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृध्दी,युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्तीरोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१  यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्तीके कॉर्प फांउडेशन  गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियनयार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्तीन्युट्रीशियन  तसेच क्षमता वृद्धीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *