Big9news Network
शिवदारे कॉलेज,जुळे सोलापूर या ठिकाणी वाहतूक प्रबोधना संदर्भात कार्यक्रम पार पडला. यावेळी वाहतुकीचे नियम तसेच सुरक्षितता या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ श्रीमती दिपाली धाटे, पोलीस उपायुक्त मुख्यालय श्री राजशेखर शिवदारे,अध्यक्ष श्री दीपक आर्वे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा प्राचार्य पाटील, प्राचार्य कांबळे सर व सुमारे 200 विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापुढील काळातदेखील वेगवेगळ्या शाळा व कॉलेजेस मध्ये वाहतुक प्रबोधन संदर्भात कार्यक्रम राबवले जाणार आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ दिपाली धाटे यांनी दिली