Big9 News
समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महिला दिनानिमित्त ७५ वर्षे पूर्ण झालेल्या 9 महिलांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाबाई निन्ने व प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे व दानशुर शांताबाई निवृत्ती गायकवाड होते. प्रांजली सोनवणे व शांताबाई गायकवाड यांच्या हस्ते ७५ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रांजली सोनवणे यांनी ओघवत्या शैलीत महिलांना प्रबोधन केले. जेष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाबूराव नसणे, अशोक खानापुरे, मन्मय कोनापुरे, शिवलिंग शहाबादे व चंद्रकांत बिराजदार यांसह पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन प्रा. सुरेश तानवडे यांनी केले.