आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत येडशी-रामलिंग-बार्शी निसर्ग भ्रमंती
चिंचोलीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण
सोलापूर, दि.16 सोलापूर वनविभागाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी येडशी-रामलिंग अभयारण्य आणि बार्शी पर्वतरांगेत ७५०० मीटरची निसर्ग भ्रमंती करण्यात आली.
निसर्ग भ्रमंतीमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सोपान टोणपे, नगर प्रशासनचे आशिष लोकरे, सहायक वनसंरक्षक बाबा हाके, पोलीस निरीक्षक श्री करंजकर यांच्यासह नगरपालिका मुख्याधिकारी अग्रवाल आदी सामील झाले होते.



75 जणांच्या हस्ते 75 प्रकारच्या वृक्षाचे रोपण चिंचोली ता. बार्शी येथे मियावाकी पद्धतीने जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांच्यासह पोलीस, महसूल, वन व इतर विभागाच्या 75 जणांच्या हस्ते विविध प्रकारच्या वन जातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. वाईल्ड लाईफ काँजर्वेशन असोसिएशनचे प्रतिनिधी श्री. हिरेमठ यांनी विविध वन जातीची, पक्षांची माहिती दिली.
चिंचोली येथील लावण्यात आलेल्या वनाला स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद रोपवन असे नाव देण्यात आल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली.
हर घर तिरंगा उत्सवात हिरवा रंग पृथ्वी, माता आणि निसर्गाचे प्रतिक आहे. यामुळे वृक्षारोपण करून निसर्गाला वाचविणे महत्वाचे आहे.